शिरोली / प्रतिनिधी दि. २/ १०/१८
अवधूत मुसळे
एमआयडीसी पोलीस ठाणेचे प्रमुख सपोनि परशुराम कांबळे यांना सर्वोत्कृष्ठ प्रकटीकरण पुरस्काराने पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गौरविले.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक यांच्या उपस्थित महिन्यातील पोलीस ठाण्याच्या गुन्हे संदर्भात सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली जाते. या बैठकीत एमआयडीसी पोलीस ठाणेचे प्रमुख सपोनि परशुराम कांबळे यांनी एका गुन्हयातील तात्काळ २o लाख ३५ हजार रोख रक्कमेची रिकव्हरी केली होती. तसेच ३९४ रॉबरी गुन्हा तात्काळ आपल्या सहकाऱ्यांच्या साह्याने उघडकीस आणला होता. या आव्हानात्मक गुन्हे उघडकीस आणण्याच्या कामगिरी बद्दल पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांचा सर्वोत्कृष्ठ प्रकटीकरण पुरस्कार प्रमाणपत्र देऊन गुणगौरव केला. या प्रसंगी सपोनि सुशांत चव्हाण, पोलीस कर्मचारी वसंत पिंगळे,मच्छींद्र पटेकर, सतिश जंगम, सुरेश कांबळे यांचे ही कामगिरी बद्दल कौतुक करण्यात आले.
फोटो
एमआयडीसी पोलीस ठाणेचे प्रमुख सपोनि परशुराम कांबळे यांना पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख गौरवितांना शेजारी सपोनि सुशांत चव्हाण व पोलीस कर्मचारी