हणबरवाडी ः येथे अंगणवाडी पायाखुदाई प्रसंगी तालूका पंचायत सदस्य प्रितम पाटील, सचिन खोत, मारूती कोळेकर व अन्य
--------------------------------
कोगनोळी ( अनिल पाटील) ता. 21 ः हणबरवाडी (ता. निपाणी) येथे ग्राम पंचायत अतर्गत एनआरजी 10 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येत आसलेल्या अंगणवाडीचा पायाखुदाई शुभारंभ तालूका पंचायत सदस्य प्रितम पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत सदस्य सचिन खोत हे होते.
स्वागत व प्रास्ताविक ग्राम पंचायत सदस्य मारूती कोळेकर यांनी केले.
यावेळी बोलताना सचिन खोत म्हणाले गेल्या अनेक दिवसापासून हणबरवाडी येथे अंगणवाडीची गरज होती ती लक्षात घेवून माजी मंत्री वीरकुमार पाटील, जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, प्रितम पाटील यांनी लक्ष देवून ग्राम पंचायत अतर्गंत एनआरजी मधून 10 लाखाचा निधी मंजूर केला आहे. हे काम लवकरच होणार आसल्याने नागरिकांतून समाधाण व्यक्त होत आहे. या अंगणवाडीमुळे मुलांची सोय होणार आहे.
यावेळी एसडीएमसी अध्यक्ष सागर खोत, मुख्याध्यापक डी. एस. नाईक, दादू खोत, सरदार पोवाडे, कृष्णात खोत, अमर खोत, विजय खोत, प्रशांत पोवाडे, संजय डूम, प्रकाश काशीद, अजित चौगुले यांच्यासह अन्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------------------------------------------------------