हातकणंगले / प्रतिनिधी
सलीम खतिब
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या हातकणंगले तालूका शाखेतील विविध दैनिकांच्या व इलेक्ट्रॉनिक चॅनेल्स मेडियाच्या पत्रकारांचा परिचय व पत्रकारांच्या समस्या जाणून घेणेसाठी दलित मित्र डॉ.अशोक माने यांनी स्नेहमेळावा देशभक्त रत्नाप्पा कुंभार सहकारी मागासवर्गिय सुतगिरणी येथे आयोजित केला होता.
यावेळी संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील ,तालुका अध्यक्ष प्रा. रविंद्र पाटील, कौन्सील मेंबर अतुल मंडपे, संजय दबडे, संतोष सणगर, अनिल तोडकर यांनी ग्रामिण पत्रकारांच्या विविध समस्या मांडून राज्य शासनाकडून खालील मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी डॉ. अशोकराव माने यांनी शासन दरबारी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
ग्रामिण पत्रकारांच्या मागण्या
१) कोल्हापर जिल्ह्यातील सर्व ग्रामिण पत्रकारांना मोफत नगरपालिका, नगरपंचायत , परिसरातील मोठे गांव येथे प्लॉट व हौसिंग सोसायटीच्या माध्यमातून म्हाडा अंतर्गत घरे मंजूर करावीत.
२ ) पेन्शन योजना सुरू करावी
3) मोफत एस.टी. प्रवास सेवा पास मिळावेत
४ ) टोल फ्री पास सेवा मिळावी.
५) आरोग्य विमा योजना लागू करावी
६ ) पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आर्थिक मदत, व्यावसाईक शैक्षणिक फी माफ व्हावी.
७ )पत्रकार संघास पत्रकार दिन , पत्रकार पुरस्कार कार्यक्रम, पत्रकार कार्यशाळा आदी कार्यक्रम आयोजनासाठी शासनाकडून अर्थसहाय्य मिळावे.
८ ) बारा तालूक्याच्या ठिकाणी पत्रकार भवन स्थापन व्हावे.
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या हातकणंगले तालूका शाखेच्या वतीन जि.प. सदस्य तथा चेअरमन दलित मित्र डॉ. अशोक माने यांना पत्रकारांच्यासाठी शासनाकडून विविध सोयी सुविधा मिळणेबाबत लेखी निवेदन देतांना संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, संजय दबडे, अतुल मंडपे, प्रा. रविंद्र पाटील, आनंदा काशिद,सुरेश कांबरे, संतोष सणगर, राजू पाटील, भाऊसाहेब सकट,अनिल तोडकर, बाळासाहेब चोपडे,बाळासाहेब कांबळे, विवेक स्वामी, लक्ष्मण कांबरे, सतिश पाटील,सलीम खतीब, सुरज पाटील, अवधूत मुसळे, हरी बुवा, कुबेर हंकारे, दिपक यादव, सतीष मोरे, आण्णा कामत, नाना जाधव, रविंद्र पाटील, एस.आर. जाधव, अनिल बाबर, उदय पाटील, प्रविण जाधव, भाऊसाहेब दाबाडे, सुरेश कुंभार, शिवाजी चव्हाण, युवराज पाटील, राजेंद्र जगदेव, अजित लटके ,शैलेंद्र चव्हाण, रमेश शिंगे, उत्तम हुजरे, अमित काकडे, अनिल हजारे, संजय काजवे, प्रविण पवार, गजानन खोत, तानाजी पाटील, टिपू सनदी, अमोल नांद्रे, विठ्ठल मोहिते, संजय साळुंखे, संभाजी भालबर, रामनाथ डेंगळे, कोळी, रवि जत्राटकर, प्रविण मोरे, विनोद खोत, अल्लाऊद्दीन मुल्ला, आदी ५७ पत्रकार उपस्थित होते.