कोल्हापूर प्रतिनिधी
शुक्रवार दिनांक 29। 1। 2019 रोजी राजर्षी शाहू विद्यालय कसबा बावडा कोल्हापूर सीआरसी क्रमांक 7 अंतर्गत चौथी शिक्षण परिषद डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक च्या सभागृहांमध्ये उत्साहात व आनंदात पार पडले कै यशवंतराव भाऊराव पाटील विद्यामंदिर व हायस्कूलच्या मुख्याध्यापकानी शिक्षण परिषदेचे यशस्वी नियोजन केले.
केंद्र मुख्याध्यापक डॉ.अजितकुमार पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगतामध्ये शैक्षणिक धोरण बद्दल बोलताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असताना यांच्यातील सुप्त गुण ओळखून शिक्षकांनी देशाच्या विकासासाठी खंबीरपणे व सक्षम असा विद्यार्थी तयार केले तरच डॉ ए पी जे अब्दुल कलाम सर यांचे भारत एकविसाव्या शतकातील जगातील एक महान देश बनेल.असे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण सर्वजण कटीबद्द आहोत ते आपले परम कर्तव्य आहे.कोरोनाकाळींन शाळा व समाज यांच्यातील वातावरण चिंताजनक होत आहे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणार नाही याची दक्षात आपण सर्वांनी मिळून घेतली पाहिजे.विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम, अभ्यास हा ऑनलाइन, ऑफलाईन, मिसकॉल द्या रेडिओ,स्वाध्याय उपक्रम, शनिवारच्या गोष्टी,पीडीएफ अभ्यासक्रम यासारख्या मीडिया चा वापर करून शोसल डिस्टनस,मास्क,व आरोग्य सांभाळून पालकांनी घरी अभ्यास पूर्ण जरून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावीअसा .मौलिक संदेश दिला.
मुख्याध्यापिका सौ छाया हिरुगडे मॅडम गौतमी पाटील मॅडम व डॉ अजितकुमार पाटील यांनी उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी बजावणार्या व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे गुलाब पुष्प व महिलांसाठी योगासन पुस्तक देऊन अभिनंदन केले. शिक्षण परिषदेमध्ये श्री सुखदेव सुतार यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा आणि प्रशिक्षण आर ए रावराणे ,जयश्री सावंत यांनी शालेय नेतृत्व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास ,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि शालेय नेतृत्व या विषयावर श्री गोरख वातकर, सुप्रिया पाटील याने शाळा समूह आणि स्थानिक प्रशासन, माहिती तंत्रज्ञान आणि नेतृत्व याविषयी पाटील यांनी सुरेंद्र बडद यानी व्यावसायिक शिक्षण, श्री अमित परीट व सौ विद्या पाटील मॅडम यांनी सर्व समावेशित शिक्षण व शिक्षणाचे सार्वत्रिकरण या विषयावर मार्गदर्शन केले यूआरसी चे विषय तज्ञ श्रावण कोकितकर सर यांनी परिषदेला भेट देऊन nep 2020 याविषयी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमासाठी कांबळे सर, चौगले सर, रामराजे सुतार सर यांचे विशेष सहकार्य लाभले सौ गौतमी पाटील यांनी उपस्थित मुखाद्यापक, शिक्षक यांचे आभार मानले एकंदरीत चौथी शिक्षण परिषद आनंदात व उत्साहात पार पडली.