पेठ वडगाव / प्रतिनिधी
मिलींद बारवडे
शारीरिक शिक्षकांना संच मान्यतेत समाविष्ट करणेत यावे तसेच राज्यातील शालेय खेळाडूंना ग्रेस गुण देऊन त्याचे हक्काचे गुण असल्याने त्यापासून वंचित राहू नये यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण संघटनेच्यावतीने राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली. यावेळी शिक्षण मंत्री यांनी याबाबत त्रुटींचा विचार करून ताबडतोब निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन संघटनेला देण्यात आले.
राज्यात शारीरिक शिक्षण शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत.शिक्षक भरती प्रक्रियेत या पदांना प्राधान्य मिळावे . राज्यस्तरावर शिक्षक संचमान्यता (पोर्टल) ऑनलाइन भरतीप्रक्रियेत उल्लेखच नाही .यामुळे राज्यात या सर्व विषयांवर त्याच्या पदांना मान्यता दिली जात नाही .राज्यात शिक्षण विषयक 2012 पासून ही पदे भरलेली नाहीत शिक्षक संच मान्यतेच्या ऑनलाइन प्रक्रियेत या सर्व अर्हता व पदांचा बीएड समकक्ष उल्लेख करून शालेय संचमान्यतेत समावेश करणे गरजेचे आहे .तसेच इयत्ता सहावी ते नववी पर्यंत शिकत असलेल्या शालेय स्पर्धेत सहभागाबद्दल ग्रेस गुण देण्याची तरतूद आहे परंतु त्या खेळाडूस दहावी व बारावी मध्ये खेळणे अनिवार्य असल्याची अट आहे .यावर्षी covid-19 च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात शालेय क्रीडा स्पर्धा होऊ शकले नाही .सदर परिस्थिती अपवादात्मक आहे यावर्षी दहावी बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी पूर्वी खालील वर्गात असताना क्रीडा स्पर्धेत मिळालेले गुण मिळणे गरजेचे आहे आहे .यासाठी शासनाने क्रीडा स्पर्धेत खेळलेल्या पात्र शालेय खेळाडूंना दहावी बारावी शालेय क्रीडा स्पर्धा संदर्भातील अधिक गुण देणे त यावे अशी मागणी या वेळी निवेदनाव्दारे करण्यात आली.यावेळी संघटनेचे अध्यक्ष आर.डी .पाटील सचिव संदीप पाथरे,उपाध्यक्ष चंद्रशेखर शहा,डी एस घुगरे राजेंद्र बुवा,संताजी भोसले, महेश सूर्यवंशी ,प्रदीप साळोखे ,अमित शिंत्रे,शंकर पवार,संदीप पाटील,रामचंद्र हालके,वैशाली पाटीलसह क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
-----------------------------------
फोटो
कोल्हापूर जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघानेच्या वतीने विविध प्रश्नांचे निवेदन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना देताना संघटनेचे अध्यक्ष आर.डी .पाटील, चंद्रशेखर शहा ,संदीप पाथरे ,संताजी भोसले आदी.