कोल्हापूर / प्रतिनिधी
ता. १८ / १ /२१
दि.०१ नोव्हेंबर,२००५ पूर्वी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकडीवर नियुक्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीचे निवेदन राज्याच्या शिक्षणमंत्री नाम.प्रा. वर्षाताई गायकवाड यांना कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने
शिष्टमंडळाव्दारे देण्यात आले. शिक्षणमंत्री नाम. गायकवाड यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी राज्याचे गृहराज्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे
पालकमंत्री नाम.सतेज उर्फ बंटी डी पाटील उपस्थित होते.
यावेळी १० जुलै, २०२० रोजी प्रस्तावित केलेली महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी(सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम १९७७ संबंधीत अधिसूचना रद्द केल्याबद्दल शिक्षणमंत्र्याचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात १० जुलै, २०२० ची अधिसूचना रद्द होवून दि. ०१ नोव्हेंबर,२००५ पूर्वी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांवरील नियुक्त पण ०१ नोव्हेंबर, २००५ नंतर १००% शासन अनुदान मिळालेल्या
शिक्षक/कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना मिळण्याचा मार्ग सोईस्कर झालेला असताना संदर्भ क्र.२च्या शासन निर्णयाने वरील विषयास अनुसरून सम्यक समिती स्थापन केलेली आहे. त्यामुळे पुन्हा
वरील विषय संदर्भात संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.१८ डिसेंबर, २०२० च्या शासन निर्णयाने स्थापन केलेली सम्यक समिती रद्द करण्याची
मागणी ५ जानेवारी, २०२१ रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री नाम. सतेज उर्फ बंटी डी. पाटील व शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत केली होती. सदर समिती
रद्द न करता शिक्षक आमदार व संघटना प्रतिनिधी यांचा समावेश करून समितीचा अहवाल तात्काळ सकारात्मक घेवून, वित्त विभागाची संमत्ती घेवून राज्यातील खाजगी शासन मान्य प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यावरील ०१नोव्हेंबर,२००५ पूर्वी नियुक्त पण ०१ नोव्हेबंर, २००५ नंतर १००% अनुदानावरती आलेले पूर्णवेळ व अर्धवेळ शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर, सेक्रेटरी दत्ता पाटील.
मुख्याध्यापक संघाचे संचालक व मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.
फोटो
शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड व पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यांशी चर्चा करतांना मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी.