पेठवडगांव / प्रतिनिधी
दि.24/1/21
शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापुरात भेट घेतल्यानंतर शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या वर सविस्तर चर्चा झाली त्यानंतर शरद पवार यांनी ॲक्शन प्लॅन तयार करण्याची सूचना ना. हसन मुश्रीफ यांना केली. ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कृती आराखडा तयार करण्याचे आश्वासन शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले.
यावेळी शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात यांच्यासह अंबादास वाजे, आबासाहेब जगताप, विनायक शिंदे, चंद्रकांत यादव, बाळासाहेब निंबाळकर ,कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष रवीकुमार पाटील ,जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील ,कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा लक्ष्मी पाटील,
अविनाश गुरव, संतोष जगताप, संजय बुचडे, किरण सोनी, अन्वर मुजावर, सुधीर भाट, भगवान कोर यांच्यासह शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
फोटो
प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजी थोरातसह जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील सरचिटणीस सुनील पाटील जिल्हाअध्यक्षा लक्ष्मी पाटील शिष्टमंडळ