हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.27/1/21
हेरले ( ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायतीच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा राणी पाटील यांनी स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाची माहिती दिली.
पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञासह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या अभियानातंर्गत निबंध स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचा बक्षीस वितरण समारंभही संपन्न झाला. हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम व सर्व महिलांना प्लास्टिक मुक्ती अभियानातंर्गत कापडी पिशवी वाटपाचा कार्यक्रमही संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या महिला राज्य कार्याध्यक्षा राणी पाटील यांनी स्वच्छता व कचरा व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान दिले.
याप्रसंगी महिला बाल कल्याण सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील,पंचायत समिती सदस्या मेहरनिगा जमादार, डॉ. राहुल देशमुख, सरपंच अश्विनी चौगुले,उपसरपंच राहुल शेटे, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण , मुनीर जमादार, ग्रामपंचायत सदस्य सतीश काशीद, डॉ. शरद आलमान, दादा कोळेकर, विजया घेवारी, स्वरूपा पाटील, आरती कुरणे, निलोफर खतीब आदी मान्यवरासह महिला उपस्थित होत्या.
फोटो
हेरले येथील कार्यक्रमात बोलतांना महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या महिला राज्य कार्याध्यक्षा राणी पाटील महिला बाल कल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील व अन्य मान्यवर.