हातकणंगले / प्रतिनिधी
मिलींद बारवडे
दि.19/1/21
रोटरी क्लब ऑफ गर्गिस हा गेल्या १३ वर्षा पासून कोल्हापुरात नावारुपाला आलेला कार्यरत महिलांचा क्लब आहे. रोटरी क्लब ऑफ गर्गिस ने शिक्षण, आरोग्य, कॉविड वैद्यकीय उपकरणांचे दान, कृषी, समाज सेवा, कला आदी क्षेत्रांत ह्या वर्षी कोविड बंधनाचे पालन करून केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
असाच एक कार्यक्रम पॅवेलियन हॉटेलच्या सभागृहात 'होकेशनल अवॉर्ड'हा पुरस्कार सोहळा क्लबनी आयोजित केला, ज्यात कामाच्या ठिकाणी आपल्या जबाबदारीच्या पलीकडे जाऊन, समाजाचे प्रबोधन केले आहे. अशा व्यक्तींना सन्मानित केले गेले.
ह्या पुरस्काराचे मानकरी प्रा. रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष सणगर, मातोश्री वृद्धाश्नमाच्या प्रमुख वैशाली भूतकर व माजी नगरसेवक राजसिंह शेळके.आदींना रोटरीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षपदावरून बोलतांना रोटरीचे प्रांतपाल संग्राम पाटील म्हणाले सहसा पुरस्कार हे नवांकित व्यक्तींना प्रदान केले जातात, परंतु “होकेशनल अवॉर्डचे वैशिष्ट्य असे आहे, कि जनसामान्य कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाची पोच पावती देण्यासाठी, हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ह्या प्रसंगी सह प्रांतपाल रो. डॉ. सुहास कुलकर्णी, उत्कर्षा पाटील ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.
रोटरी क्लब ऑफ गर्गीजच्या अध्याक्षा गौरी शिरगावकर यांनी रोटरीच्या या उपक्रमा मागील उद्दिष्ट्ये सभेत सांगितले. तसेच सचिव अंजली मोहिते यांनी उपस्तीथांचे आभार मानले. गौरी शिरोडकर ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. या कार्यक्रमात क्लबच्या खजानीस मधुलिका जगदाळे, व इतर सदस्यासह अशा जैन, लक्ष्मी शिरगावकर, उन्नती सबनीस, अनघा पेंढारकर, बीना जनवाडकर, सुलक्ष्मी पाटील ह्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
फोटो
'होकेशनल अॅवार्ड' सन्मानितसह पदाधिकारी डावीकडून सचिव अंजली मोहिते, खजानीस मधुलिका जगदाळे, उत्कर्षा पाटील, प्रांतपाल संग्राम पाटील, सहप्रांतपाल सुहास कुलकर्णी, अध्यक्षा गौरी शिरगावकर.बसलेले डावी कडून संतोष सणगर, प्रा.रवींद्र पाटील, माजी नगरसेवक राजसिंह शेळके वैशाली भुतकर यांच्या प्रतिनिधी लक्ष्मी पाटील आदी मान्यवर.