कोल्हापूर / प्रतिनिधी
मिलींद बारवडे
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाळ तथा लक्ष्मण सखाराम डेळेकर यांची बिनविरोध निवड झाली.निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन सहाय्यक निबंधक अधिन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर चे ए.बी.गराडे यांनी काम पाहिले.यावेळी शिक्षक नेते कोजिमाशी चे तज्ञ संचालक दादासाहेब लाड प्रमुख उपस्थित होते.
संस्थेचे चेअरमन कैलास सुतार यांनी राजीनामा दिल्याने रिकाम्या जागी त्यांची निवड करण्यात आली.बाळ डेळकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.चेअरमनपदासाठी त्यांचे नाव संचालक सदाशिव गणपतराव देसाई यांनी सुचवले तर संचालक अरविंद मारुती किल्लेदार यांनी त्यास अनुमोदन दिले.विरोधी संचालकांनी सभेकडे पाठ फिरवली.
स्वागत व प्रास्ताविक शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी केले.विषय पत्रिकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी केले.यावेळे नुतन अध्यक्ष बाळ डेळेकर यांनी सभासदांच्या विश्वासा स पात्र राहुन काम केल्याने संचालक पदाच्या कार्यकाळात तिसर्यादा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला ही अभिमानाची गोष्ट आहे.शिक्षक नेते दादासाहेब लाड व संचालक मंडळ यांनी माझी केलेली बिनविरोध निवड ही संस्थेच्या इतिहास एक वेगळा आदर्श निर्माण करणारे ठरेल असे काम माझ्या हातून होईल.असे वचन दिले
यावेळी व्हा.चेअरमन सुभाष पाटील, संचालक आनंदराव काटकर, ,कृष्णात पाटील, कृष्णात खाडे, शांताराम तौंदकर, राजेंद्र रानमाळे,अनिल चव्हाण, कैलास सुतार,सौ.सुलोचना कोळी,जर्नादन गुरव यांच्या सह उप मुख्यकार्यकारी
अधिकारी जयवंत कुरडे,प्रशासन अधिकारी उत्तम कवडे,बाळ डेळेकर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाळ डेळेकर यांच्या निवडी नंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला.आभार व्हा.चेअरमन सुभाष पाटील यांनी मानले.
कोजिमाशी पत संस्थेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिल मे दरम्यान होण्याची शक्यता आहे.या पाश्र्वभूमीवर शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी एका अनुभवी,जेष्ठ , सभासद प्रिय, मातब्बर अशा संचालकांना संधी देऊन विरोधका समोर आव्हान निर्माण केले आहे.