हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.4/1/21
हातकणंगले तालुक्यातील मौजे तासगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकित समझोता एक्स्प्रेस सुसाट धावली असून माजी सरपंच शिवाजीराव पाटील गटाने सात तर संपतराव पाटील गटाने दोन जागा घेत एकूण नऊ जागा बिनविरोध झाल्याने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे.
बिनविरोध निवडले गेलेले सदस्य पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक एक-
शिवाजीराव आकाराम पाटील, सुनीता तानाजी पाटील,जयश्री दिलीप सुतार
प्रभाग क्रमांक दोन-
चंद्रकांत आण्णा गुरव, सागर कृष्णात पाटील, कु अंजली दिलीप कुरणे
प्रभाग क्रमांक तीन -
विद्या कृष्णात पाटील,पौर्णिमा आदिनाथ कांबळे, बाबुराव आनंदा कांबळे
दरम्यान ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानत जिल्हा परिषद सदस्य, आमदार,खासदार तसेच सर्वपक्षीय नेते मंडळींच्या सहकार्याने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील (काका) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.