पेठवडगांव / प्रतिनिधी
दि.31/1/21
वडगाव विद्यालय जुनियर कॉलेजचे मुख्याध्यापक आर. आर. पाटील यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ मुंबईच्या कौन्सिल सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा वडगाव विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापक आर आर पाटील यांनी ३२ वर्षाच्या सेवेत सामाजिक शास्त्र विषयाचे उत्कृष्ट अध्यापनाचे केले आहे.त्यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून शाळेत विविध उपक्रम राबवून शाळेचा लौकिक वाढवत विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी प्रयत्नशीलआहेत. त्यांच्या कार्याची दखल लायन्स क्लबने घेऊन'आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार' व रोटरी क्लब ऑफ गार्गीजने 'नेशन बिल्डर अवॉर्ड' देऊन सन्मानित केले आहे. त्यांचे उत्कृष्ट शैक्षणिक कार्य पाहून शिक्षक नेते दादासाहेब लाड, कोजिमाशी सभापती बाळासाहेब डेळेकर,मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील यांनी त्यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ मुंबईच्या कौन्सिल सदस्य पदी निवड केली. या पदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे पर्यवेक्षक डी. के. पाटील यांच्या हस्ते मुख्याध्यापक आर आर पाटील व त्यांच्या पत्नी सौ आर आर पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी पी जी सुब्रमणी अविनाश आंबी डी. एस.शेळके, डी.एस. कुंभार, मिलिंद बारवडे, जावेद मणेर, सचिन पाटील, अकबर पन्हाळकर, अतुल पाटील, एन एम वडगावकर , ए एम रुग्गे ए एस च०हाण, यु. सी. पाखरे,ए. डी. जाधव आदी मान्यवरांसह शिक्षकवृंद उपस्थित होता.