हातकणंगले / प्रतिनिधी
प्रशांत तोडकर
हेरले (ता. हातकणंगले) येथे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व गाव कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती राजेश पाटील होते. या सभेत पंधरा ते वीस मे गावामध्ये पाच दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये औषध दुकाने, दूधसंस्था, खाजगी दवाखाने या अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गावातील प्रत्येक वार्डात तीन ग्रामपंचायत सदस्य, एक आशा स्वयंसेविका, एक अंगणवाडी सेविका, तीन शिक्षक, एक ग्रामपंचायत कर्मचारी, दोन मेडिकल असोसिएशनचे कार्यकर्ते,चार सामाजिक कार्यकर्ते, असा आरोग्य सेवा गट तयार करण्यात आला आहे. या गटास ऑक्सिमिटर, थर्मलगन, हँडग्लोज, मास्क, सॅनिटायझर ही वैद्यकिय साधने दिली जाणार आहेत. असे सहा वार्डामध्ये आरोग्य सेवा गट कार्यरत होऊन गावांमध्ये तीन दिवसांमध्ये प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करतील व यामधील आजारी व संशयित आढळणाऱ्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये समुपदेशन करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. या सर्वेक्षणामध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णास अतिग्रे येथील कोवीड सेंटरमध्ये उपचारास भरती केले जाईल.
सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांना गावातील मराठी शाळेमध्ये दोनशे क्षमतेचे अलगीकरण करून त्यांच्यावर त्या वॉर्डातील खाजगी डॉक्टर व प्राथमिक आरोग्य केंद्र उपचार करणार आहे. या उपक्रमाद्वारे गावामधील सर्वपक्षीय समिती कोराना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
या प्रसंगी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल देशमुख, पोलीस पाटील नयन पाटील, प्रा. राजगोंड पाटील आदींनी विविध उपचार व उपक्रमाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, मुनीर जमादार, माजी उपसभापती अशोक मुंडे,माजी उपसरपंच संदीप चौगुले, उपसरपंच सतीश काशीद, माजी उपसरपंच विजय भोसले, राहुल शेटे, माजी सरपंच रियाज जमादार, माजी उपसरपंच कपिल भोसले, गुरुनाथ नाईक, ग्रामपंचायत सदस्य मज्जीद लोखंडे, डॉ. शरद आलमान, आदिक इनामदार, निलोफर खतीब, श्रीकांत पाटील, विशाल परमाज, अश्फाक देसाई, सलीम खतीब, संजय पाटील, प्रशांत तोडकर, दादोसो कोळेकर, डॉ. प्रविण चौगुले, अरविंद चौगुले, बाजीराव कटकोळे, शिवराज घेवारी आदी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक मुनिर जमादार यांनी केले. आभार माजी उपसरपंच विजय भोसले यांनी मानले.
फोटो
हेरले : येथील सर्वपक्षीय समिती बैठकीत
माजी सभापती राजेश पाटील,महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील, पोलीस पाटील नयन पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख व अन्य मान्यवर.