हेरले / प्रतिनिधी
दि.29/5/21
हेरले ( ता. हातकणंगले ) येथे तीन दिवसाचा लॉकडाऊन ग्रामस्थ व्यापारी व तरूण वर्गाच्या सहकार्याने कडकडीत यशस्वी झाला.
हेरले गावातील कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणून गाव कोरोना मुक्त करण्यासाठी उपाय योजना म्हणून ग्रामपंचायत व कोरोना सनियंत्रण समितीच्या वतीने २७ मे ते २९ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर सनियंत्रण समितीने तीन दिवस खासगी सुरक्षा दलाच्या जवानांना पाचारण
केले. त्यांनी पहिल्या दिवशी गावातील प्रमुख मार्गावरून संचलन करीत ग्रामस्थांना घरी रहा सुरक्षित राहा असा संदेश देऊन प्रबोधन केले. तीन दिवस खासगी सुरक्षा दलाच्या जवानांनी गस्त घालीत चोख बंदोबस्त बजाविला. गावातील व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार , तरूण मंडळाचे कार्यकर्ते यांनीही लॉकडाऊनास प्रतिसाद दिला. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. ग्रामस्थांनीही घरामध्ये राहून प्रतिसाद दिला. त्यामुळे तीन दिवस गावात वर्दळ न होता शुकशुकाट होता.
पोलिस पाटील नयन पाटील, माजी उपसरपंच संदीप चौगुले, उपसरपंच सतिश काशिद, माजी उपसरपंच विजय भोसले, राहूल शेटे,ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सहभागी होत तीन दिवसात गावात प्रबोधन संदेश देत लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.