हेरले / प्रतिनिधी
दि.7/5/21
हेरले ( ता. हातकणंगले) येथे पाच दिवस कडकडीत लॉकडाऊन संपल्यानंतर गावातील कोरोना संसर्ग संपुष्टात येई पर्यंत कडक नियमांची अंमलबजावणी - साठी ग्रामपंचायतीच्या वतीने सभाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामपंचायत हेरले कोविड-१९ नियंत्रण संदर्भात सभा आयोजित केली होती. या सभेस , वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख ,जि.प. महिला व बालकल्याण सभापती डॉ.पद्माराणी पाटील, पंचायत समिती सदस्या मेहरनिगा जमादार,पोलिस पाटील श्रीमती नयन पाटील,सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच सतीश काशीद, तलाठी एस. ए. बरगाले ,ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, बीट आंमलदार मोहिते, मुनिर जमादार , माजी उपसरपंच विजय भोसले, राहूल शेटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य आदींच्या उपस्थित सभा संपन्न झाली .
या सभेमध्ये पुढील विषयावरती चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. गावातील कोणतीही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्यांचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येईल.तसेच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या वीस व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात येईल,कोरोना संसर्ग संपेपर्यंत गावातील आठवडा बाजार भरवला जाणार नाही, सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत भाजीपाला व फळे विक्रेत्यांनी फिरून विक्री करणेस परवानगी राहील, किराणा दुकाने,गिरण,बेकरी दुकानेही सकाळी याच वेळेत चालू राहतील,विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दोनशे रुपये दंड करण्यात येईल,मेडिकल, खाजगी दवाखाने,दूध डेअरी सुरू राहतील, गावातील इतर सर्व व्यवसाय बंद राहतील याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे.