हातकणंगले / प्रतिनिधी
दि.15/5/21
कोल्हापूर महानगरपालिकेच्या शेणी दान आवाहनास प्रतिसाद देत पश्चिम महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल सेल्स एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन, (ई-सेवा) कोल्हापूर यांनी दहा हजार शेणी महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस दान केल्या.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमी, बापट कँम्प, कसबा बावडा तसेच कदमवाडी येथे मृतदेहांवर महापालिकेच्यावतीने मोफत अंत्यविधी करण्यात येतो. सध्या कोविड -१९ चा प्रार्दुभाव वाढलेने मृत्युंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना बाधीतांची मृत्यूसंख्या वाढत असलेने त्यांच्यावर कराव्या लागणाऱ्या अंत्यविधीसाठी शेणी व लाकूड भविष्यात कमी पडू नये म्हणून महापालिकेच्या स्मशानभूमीस शेणी दान करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते.
या आवाहनास पश्चिम महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल सेल्स एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन, (ई-सेवा) कोल्हापूर यांनी प्रतिसाद देऊन दहा हजार शेणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस दान केल्या आहेत. या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष किरण दीक्षित, उपाध्यक्ष सतीश चौगुले, सचिव विनय कुंभार, खजिनदार संदीप बनसोडे, संचालक संतोष देसाई, सभासद निखिल पोवार, स्वप्निल चौगुले तसेच असोसिएशन संचालक आणि सभासद उपस्थित होते. अशी माहिती प्रसिध्दीस सतीश चौगुले यांनी दिली.
फोटो
कोल्हापूर महानगरपालिकेस शेणी दान करतांना इलेक्ट्रीक सेल्स एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष किरण दिक्षित उपाध्यक्ष सतीश चौगुले स्वप्नील चौगुले आदीसह अन्य संचालक व सभासद.