हेरले / प्रतिनिधी
दि.19/5/21
हेरले( ता. हातकणंगले) येथील कमॉन इंडिया मित्र मंडळ व अमर वड्ड युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शेतमजुर व कष्टकरी कुटुंबांना मोफत अंडी व रेशनचे किट वाटप करण्यात आले.
कमॉन इंडिया मंडळ व अमर वड्ड युवामंच यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून रोजंदारीवर काम करणा-या कुटुंबांना लॉकडाऊनच्या काळात एक मदतीचा हात या उद्देशाने एक किलो गोडे तेल, एक किलो साखर, अर्धा किलो प्रमाणे तीन डाळी, कांदे, बटाटे आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. पाचशे कटुंबांना या ग्रुपच्या वतीने मदत दिली जात आहे. या त्यांच्या सामाजिक मदत कार्याच्या उपक्रमामुळे त्यांचे परिसरातून कौतूक होत आहे.
या सामाजिक कार्यात अमर वड्, रंजीत इनामदार, सचिन जाधव, सुकुमार लोखंडे, विजय वड्ड ,मोहन जाधव, मनोहर कलकुटकी व मंडळाच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.
फोटो
हेरले : येथे कुटुंबांना साहित्य वाटप करतांना अमर वड्ड, रंजीत इनामदार, सचिन जाधव, सुकुमार लोखंडे, विजय वड्ड ,मोहन जाधव, मनोहर कलकुटकी व मंडळाचे कार्यकर्ते