हातकणंगले / प्रतिनिधी
दि.18/5/21
हेरले (ता.हातकणंगले ) येथे प्राथमिक शाळेमध्ये वैश्विक साथ रोखण्यासाठी सकारात्मक मोहिम म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र , मेडिकल असोसिएशन, एम आर असोसिएशन आणि केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत रुग्णवाहिका सुविधा ताप उपचार केंद्र, आरटीपीसीआर चाचणी व रॅपिड अँटिजन टेस्ट सुविधा या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. रुग्णवाहिकेचा शुभारंभ जेष्ठ पत्रकार प्रा. राजगोंड पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील म्हणाल्या की, वैद्यकिय सेवेत असणारे खासगी वैद्यकिय व्यावसायिक, एमआर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन यांनी स्वंयम स्फुर्तीने सामाजिक भावनेतून ही आरोग्य सेवा मोहिम सुरू केली आहे हा उपक्रम स्तुत्य आहे. जिल्हा परिषदेच्या फंडातून यथाशक्ती आरोग्य सेवेस मदत देण्यासाठी तत्पर आहे अशी त्यांनी ग्वाही दिली.
हेरले मेडिकल असोसिएशन,मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने मराठी शाळेमध्ये रुग्णांना येण्या-जाण्यासाठी मोफत रुग्णवाहिका , ताप उपचार केंद्र, आरटिपिसीआर चाचणी, रॅपिड अँटिजेन चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे.या केंद्रामध्ये रुग्णांचा ताप व अन्य आजाराची तपासणी केली जात आहे यामध्ये संशयित रुग्ण आढळला त्यांचे आरटीपिसीआर किंवा रॅपिड अँटिजेन चाचणी याच केंद्रात केली जात आहे. यामध्ये रुग्णाची पॉझिटिव्ह चाचणी आल्यास त्यांना अतिग्रे येथील कोविड सेंटर मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व विराचार्य संस्थेच्या दोन रुग्ण वाहिकेच्या माध्यमातून भरती करण्यात येणार आहे. ही मोहिम ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेमुळे गावातील कोरोना संसर्ग आटोक्यात येऊन गाव निश्चित कोरोना मुक्त होण्यासाठी मदत होणार आहे.
याप्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ.पद्माराणी राजेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल देशमुख, प्रा. राजगोंड पाटील, पोलीस पाटील नयन पाटील, मुनीर जमादार तलाठी एस ए बरगाले, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, माजी उपसरपंच संदीप चौगुले, विजय भोसले, राहुल शेटे ,उपसरपंच सतीश काशीद, ग्राम. सदस्य बतुवेल कदम, दादासो कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मेडिकल असोसिएशनचे डॉ. महावीर पाटील, डॉ. अमोल चौगुले, डॉ.प्रविण चौगुले, डॉ. राजगोंड पाटील,डॉ. सुरेखा आलमान,डॉ. इमरान देसाई, डॉ. प्रवीण चौगुले,डॉ. नितीन चौगुले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी हेरले मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे रजत मुल्ला, विशाल परमाज, श्रेनिक राजोबा, राहुल कराळे, सुरज भोसले, किरण चौगुले, मृणाल पाटील, उमेश पाटील, रोहित मुंडे, पंकज मिरजे, प्रवीण सुतार ,सोमनाथ माने, अमोल शेटे,ओंकार मुंडे ,सौरभ कोरे, प्रकाश कुरणे, स्वप्नील जाधव, वेदू किराणे,संदीप मिरजे, राहुल कारंडे ,सचिन पाटील, राहुल कटकोळे,अश्फाक देसाई, आकाश तिवडे, अनिकेत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
केमिस्ट असोसिएशनचे शीतल पाटील, अभिषेक मोहिते,अविनाश चौगुले, अनिल पाटील, संदीप हनमंत,संदीप चौगुले, लतिफ नायकवडी आदी उपस्थित होते.
फोटो
हेरले येथे वैद्यकिय सेवा गटाच्या माध्यमातून सुरू केलेले उपचार केंद्र प्रसंगी महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील वैद्यकिय अधिकारी डॉ.राहूल देशमुख पोलिस पाटील नयन पाटील प्रा. राजगोंड पाटील मुनिर जमादार व अन्य मान्यवर