हेरले / प्रतिनिधी
दि.19/5/21
हेरले प्राथमिक आरोग्य केंद्र व मेडिकल असोसिएशन यांच्या विद्यमाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गावात उपचार केंद्र सुरू केले आहे. निश्चितच हे कार्य अतुलनीय आहे. गावातील सर्वच घटकांनी आरोग्य सेवेस सहकार्य करून गावातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशिल राहून गाव पूर्णपणे कोरोना मुक्त करावे असे आवाहन हातकणंगले तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी केले.
हेरले गावामध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने तो रोखण्यासाठी परिस्थितीची पाहणी करून मार्गदर्शनाने आरोग्य सेवा कार्यान्वित करण्यासाठी कोरोना सनियंत्रण ग्राम समितीस भेटी प्रसंगी ते बोलत होते.
तहसिलदार प्रदीप उबाळे पुढे म्हणाले की,गावातील दुकानदार, व्यापारी ,व्यावसायिक, पालेभाज्या फळभाज्या विक्रेते आदी सुपरस्प्रेडर यांची शंभर टक्के आरटीपीसीआर व अँटिंजेन चाचणी करावी, गावामध्ये विनाकारण फिरणारे, मास्क न लावणारे , सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी,पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांची कोरोना चाचणी करावी, होम आयसोलेशन न करता फर्स्ट संपर्कातील लोकांना शाळेमध्ये अलगीकरण करावे, आजारी लोकांना तात्काळ उपचार घेण्यासाठी समुपदेशन करावे, घर टू घर सर्व्हे करून कुटुंबांतील सदस्यांचे तापमान व ऑक्सिजनची पाहणी करावी आदी महत्त्वाच्या सूचना त्यांनी कोरोना सनियंत्रण ग्राम समितीस व सामाजिक सेवा संस्थांना दिल्या. प्राथमिक शाळेतील प्राथमिक आरोग्य केंद्र व मेडिकल असोसिएशनच्या वतीने सुरू असलेल्या उपचार केंद्राची पाहणी करून खासगी वैद्यकिय व्यावसायिकांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी हातकणंगले तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुहास कोरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल देशमुख,मंडलाधिकारी भारत जाधव , तलाठी एस. ए. बरगाले, ग्राम विकास अधिकारी संतोष चव्हाण,पोलीस पाटील नयन पाटील, मुनीर जमादार, प्रा.राजगोंड पाटील,अमित पाटील, प्रशांत तोडकर ,सलीम खतीब, सुदर्शन पाटील विनोद शेटे,कोतवाल मंहम्मद जमादार,माजी उपसरपंच संदीप चौगुले, विजय भोसले, राहुल शेटे, उपसरपंच सतीश काशीद आदी मान्यवर उपस्थित होते.