कोल्हापूर प्रतिनिधी
मनपा न्यू पॅलेस स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पतंजली योग शिक्षिका सामाजिक कार्यकर्त्या सौ. गीतांजली ठोमके, रिटायर प्राध्यापिका सौ. रश्मी ताम्हणकर, सौ ज्योती घाडगे, सामाजिक कार्यकर्त्या सौ सविता पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विमल जाधव यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचा माजी विद्यार्थी गुरु मुगडे याची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्टरित्या सादर केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ निकिता झोरे, शाळेतील शिक्षिका सौ वैशाली पाटील, सौ पूनम कोळी, श्री सुनील कुरणे, श्री साताप्पा पाटील, श्री अरुण सुनगार, श्री दिपक संकपाळ यांचे अनमोल सहकार्य लाभले.पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.