हेरले /प्रतिनिधी
नागाव(ता.हातकणंगले)येथील आम्रपाली संजय कांबळे हिने B.A.M.S. ही पदवी डॉ.दिपक पाटील आयुर्वेदीक कॉलेज ,बोरपाडळे, कोल्हापुर येथुन शिक्षण घेऊन अतिशय कष्टाने मिळवली.
वडील संजय यांच्या निधनानंतर त्यांची आई आक्काताई यांनी मोठ्या कष्टाने स्वतःचे घर सांभाळले. अनेकदा त्यांनी चारचौघीत आम्रपालीस 'डॉक्टर' करण्यांचे स्वप्न बोलून दाखवले होते. तेच स्वप्न आज सत्यात उतरले आहे.
बारावीला ९०% च्यापुढे मार्क पडून नीट परिक्षेत अपयश मिळाले. नाराज न होता पुन्हा जोरदार अभ्यास करून नीट पास झाली,आणि शेवटी ती B.A.M.S डॉक्टर झालीच.
वडिलांचा अकाली अपघाती मृत्यु व कौटुंबिक चढउतार यावर मात करीत यश तिने ओढून आपल्या दारात आणले.
हे तिचे यश पहायला तिचे वडील आज हयात पाहीजे होते. त्यांच्या जीवनातील हा मौल्यवान क्षण अतिशय आनंदाने साजरा केला असता ,तो आनंद पाहण्याचे चित्रच वेगळे असते.अशा भावना याप्रसंगी तिने व्यक्त केल्या.
तिच्या या यशात वडिलांची कमतरता भरून काढणारी ,कणखर व पाठीशी ठामपणे उभी राहणारी अशी आई आक्काताई,भाऊ सौरव व आजोळ 'अबंप ' चे आजोबा व मामा संतोष व संदीप यांचे अतिशय मोलाचा वाटा आहे.याचबरोबर कॉलेजचे अध्यक्ष डॉ.दिपक पाटील,डॉ.स्वाती पाटील,डॉ. समीर जमादार,डॉ.अमर अभरंगे, डॉ.केदार तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या उत्तुंग यशाने तिच्यावर नागाव पंचक्रोशीतुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.