कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 बावडा मध्ये होळी दिनाच्या निमित्ताने वनस्पतीजन्य रंग कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते पर्यावरण मित्र अनिल चौगुले यांनी आपल्या परिसरातील फळे भाजा व इतर वनस्पतीजन्य पदार्थापासून कोणकोणत्या प्रकारचे रंग कोणकोणत्या खाद्यपदार्थांमध्ये वापरता येतात व त्यांचे पर्यावरणीय उपक्रम कोणकोणते चांगले असतात हे विद्यार्थी व माता पालक गटांना बचत गटांच्या महिलांना समजावून सांगितले.
कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षणाधिकारी श्रीमती अनुराधा म्हेत्रे प्रकल्प शिक्षणाधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद व केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील उत्तम कुंभार शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा सुरुवात झाली होती.
बचत गटातील महिला माता पालक गटातील महिला व इतर मंत्रिमंडळातील विद्यार्थी व मुलींनी सहभाग उत्स्फूर्तपणे नोंदवला 45 महिलांनी कार्यशाळेमध्ये भाग घेतला होता महिलांना सक्षम करण्यासाठी 21 व्या शतकात विविध उपक्रम व लघुउद्योग उद्योजक सुरू करावेत अशी आवाहन शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे यांनी आवाहन केले व विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा दिल्या
शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड यांनी हा भारत स्काऊट गाईडचा उपक्रम व मुलांच्या पर्यावरणीय उपक्रम अत्यंत उत्कृष्ट व शाळेचे मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी व त्यांच्या टीमने उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांचे अभिनंदन केले असे उपक्रमांची सध्या महिलांना सक्षम बनण्यासाठी गरज आहे असे त्यांनी प्रतिपादन केले .
कार्यशाळेमध्ये प्राथमिक शिक्षण समितीच्या शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई मॅडम यांनी व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विशेष सहकार्य केले शालेय मंत्रिमंडळ व शालेय भारत स्काऊट गाईड विद्यार्थी यांनी या कार्यशाळेमध्ये सहकार्य केले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ केंद्रमुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तमेजा मुजावर आसमा तांबोळी विद्या पाटील अक्षरा माने,उत्तम पाटील सुशील जाधव मुख्याध्यापिका कल्पना पाटील सावित्री काळे सुप्रिया माने संध्या चौगुले आदिती बिरणगे गणेश घाडगे यश कांबळे साईराज दाभाडे व आभार उत्तम कुंभार यांनी मानले.