नागाव : येथील अध्यापक डॉ. दीपक शेटे यांनी उभा केलेल्या दुर्मिळ वस्तूंचे संग्रहालय गणितायन लॅबचे उद्या सोमवारी (दि. ११) दुपारी चार वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. विद्यार्थ्यांना गणित विषयात आवड निर्माण व्हावी आणि ते समजायला अधिक सोपं व्हावं या हेतूने या लॅबची उभारणी केली आहे.
यावेळी प्रकुलगुरू प्रा. डॉ . पी एस पाटील डॉ . कुलसचिव व्ही एन शिंदे शिक्षणाधिकारी डॉ .एकनाथ आंबोकर गणित विभाग प्रमुख प्रा .डॉ . एस एच ठकार डॉ . डी एस घुगरे,सचिव एम ए परीट पाहुणे तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व अधिकारी वर्गांच्या गणित प्रेमी शिक्षक व विद्यार्थी उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे .अशी माहिती गणित संग्रह महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. दीपक शेटे यांनी दिली .