कोजिमाशि पतसंस्थेच्या वतीने ' मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ' पुरस्कार प्राप्त शाळांचा मानपत्र देऊन गौरव.
कोल्हापूर /प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानात तालुका स्तर, व शहर स्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झालेल्या शाळांना कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने मानपत्र ,कोल्हापुरी फेटा,भिंतीवरील घड्याळ या स्वरूपात गौरविण्यात आले. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी अजय पाटील होते.
याप्रसंगी बोलताना कौस्तुभ गावडे म्हणाले, 'मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा' या स्पर्धेमध्ये सर्वच शाळांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपली शाळा सुंदर बनविण्याचा खूप चांगला प्रयत्न केला. शाळांचे अंतरंग व बाह्यरंग सुंदर बनविण्याबरोबरच उत्तम निकाल, स्वच्छता, बोलक्या भिंती, वृक्षारोपण व नावीन्यपूर्ण उपक्रम अशा सर्वच बाबीत जिल्ह्यातील सर्वच शाळांनी खूप चांगली तयारी करून सहभाग घेतला. या स्पर्धेत तालुकास्तरावर व शहर स्तरावर क्रमांक आलेल्या शाळांचे मन:पूर्वक अभिनंदन. पुरस्कार प्राप्त शाळांचा आदर्श इतर शाळांनीही घेऊन आपली शाळा सर्व पातळीवर स्वच्छ व सुंदर बनवावी असा संदेश गावडे यांनी दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपशिक्षणाधिकारी अजय पाटील म्हणाले, खऱ्या अर्थाने या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील शाळांना नवचैतन्य प्राप्त झाले आहे. यशस्वी शाळांना मानपत्र देऊन या शाळांच्या पाठीवर कौतुकाची थाप कोजिमाशि पतसंस्थेने दिली आहे. असे गौरव उद्गार अजय पाटील यांनी काढले.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक कोजिमाशि पतसंस्थेचे तज्ञ संचालक शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी केले.अत्यंत कमी कालावधीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करून या सर्व शाळांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात येत आहे. सर्वच पुरस्कार प्राप्त शाळांचे मनःपूर्वक अभिनंदन दादासाहेब लाड यांनी केले.
यावेळी पुरस्कार प्राप्त शाळा प्रथम क्रमांक आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज पेठ वडगाव, द्वितीय रयत गुरुकुल विद्यानिकेतन कुंभोज ,तृतीय डी के टी ई हायस्कूल इचलकरंजी, गगनबावडा तालुका प्रथम माध्यमिक विद्यालय सांगशी,द्वितीय माध्यमिक विद्यालय शेळोशी ,तृतीय दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय तिसंगी, राधानगरी तालुका प्रथम श्री नागेश्वर हायस्कूल राशिवडे बुद्रुक, द्वितीय श्री किसनराव मोरे हायस्कूल सरवडे, तृतीय आ.नामदेवराव भोईटे हायस्कूल कसबा वाळवे ,पन्हाळा तालुका प्रथम वारणा विद्यालय वारणानगर, द्वितीय संजीवनी विद्यालय सोमवार पेठ पन्हाळा, तृतीय आ.ब.सरनोबत गर्ल्स हायस्कूल आसुर्ले पोर्ले ,करवीर तालुका प्रथम आदर्श हायस्कूल भामटे ,द्वितीय श्रीमती बी के पाटील हायस्कूल गिरगाव ,तृतीय आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल गोकुळ शिरगाव ,शाहूवाडी तालुका प्रथम श्री निनाई माध्यमिक विद्यालय करुंगळे, द्वितीय दत्त सेवा विद्यालय तुरुकवाडी, तृतीय नागेश्वर हायस्कूल वारूळ, भुदरगड तालुका प्रथम जवाहर हायस्कूल निळपण, द्वितीय श्रीमंत छात्र जगतगुरु विद्यालय मठगाव, तृतीय कुमार भवन पुष्पनगर, शिरोळ तालुका प्रथम देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हायस्कूल राजापूर, द्वितीय ताराबाई अण्णासाहेब नरंदे हायस्कूल नांदणी ,तृतीय चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुललाट, कागल तालुका प्रथम सरलादेवी माने हायस्कूल कागल, द्वितीय मळगे विद्यालय मळगे बुद्रुक, तृतीय दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल, कोल्हापूर शहर प्रथम कोल्हापूर पब्लिक स्कूल कोल्हापूर, व्दितीय सेंट झेवियर्स हायस्कूल कोल्हापूर,तृतीय दादासाहेब मगदूम हायस्कूल कोल्हापूर अशा ३८ शाळांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले. आभार कोजिमाशि पतसंस्था चेअरमन उत्तम पाटील यांनी मानले.
यावेळी मुख्याध्यापक संघ सचिव दत्ता पाटील,विनाअनुदानित शाळा कृती समिती राज्य अध्यक्ष खंडेराव जगदाळे, डी सी पी एस राज्य अध्यक्ष करण सरनोबत,कोजिमाशि पतसंस्था व्हा.चेअरमन श्रीकांत कदम, संचालक बाळ डेळेकर,अनिल चव्हाण, डॉ. डी. एस घुगरे,प्रकाश कोकाटे, राजेंद्र रानमाळे, शरद तावदारे, पांडुरंग हळदकर, दीपक पाटील, श्रीकांत पाटील, सुभाष खामकर, मदन निकम, मनोहर पाटील, राजेंद्र पाटील, अविनाश चौगले, सचिन शिंदे, राजाराम शिंदे, जितेंद्र म्हैशाळे, ऋतुजा पाटील, शीतल हिरेमठ, सीईओ जयवंत कुरडे, डेप्युटी सीईओ उत्तम कवडे, कोजिमाशि पतसंस्था माजी चेअरमन कैलास सुतार, संजय डवर, अरविंद किल्लेदार,सुभाष पाटील तसेच पुरस्कार प्राप्त शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
कोजिमाशि पतसंस्थेच्या वतीने ' मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ' पुरस्कार प्राप्त शाळांचा मानपत्र देऊन गौरव प्रसंगी शाळा प्रतिनिधी