हेरले / प्रतिनिधी
मापनाचा इतिहास मुलांना अधिक समजावा यासाठी दीपक शेटे यांनी उभी केलेली गणितायन लॅब गणिताची जिज्ञासा वाढवत आहे असे उद्गार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ कोल्हापूर विभागाचे सचिव सुभाष चौगुले यांनी बक्षीस वितरण प्रसंगी काढले .
महाराष्ट्रामध्ये वेगळेपण ठरत असणारी गणितीय गणितायन लॅबच्या उद्घाटन निमित्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी यासाठी राबवत असलेले उपक्रम हे कौतुकास्पद आहेत असे उद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ .डी .टी .शिर्के यांनी याप्रसंगी काढले .
प्रथम - श्रावणी शेखर शिंदे
द्वितीय संध्या सचिन लंबे
द्वितीय सई विश्वास पाटील
तृतीय संस्कृती संतोष चव्हाण
तृतीय शिवानी विनोद राम
मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला .या स्पर्धेचे नियोजन कौतुक विद्यालयाचे कलाशिक्षक अतुल सुतार यांनी केले परीक्षक शिवराज धनवडे,अभिजीत भिसे, स्वप्निल लंबे यांनी केले . त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणितांचे संकल्पक डॉ दीपक शेटे यांनी केले .
सूत्रसंचालन राजेद्र पिष्टे यांनी केले.
या प्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर,प्रा .डॉ . एस एच ठकार , प्रा .डॉ . शिवाजी सादळे, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष सर्जेराव लाड , विलास आंबोळे,उद्योगपती सुधाकर तोडकर, प्राचार्य महानंदा, विजय गायकवाड , माणिक कोरे ,आदी गणित प्रेमी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते .