पेठ वडगाव /प्रतिनिधी
वडगाव विद्यालय व जुनिअर कॉलेज वडगाव मध्ये श्रीमती सुशीला देवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फाउंडेशन तसेच इंडियन वुमेन सायंटिस्टस असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त गुणवंत महिलांचा सत्कार करण्यात आला.शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी जयकुमार देसाई, पेट्रेन कौन्सिल सदस्य दौलत देसाई, चेअरमन डॉ.सौ. मंजिरी मोरे देसाई यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळ डेळेकर होते.विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. आर.आर.पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय येथील प्राध्यापिका सौ.मंजिरी कामत व सौ.अंजली पडवळ यांनी सौ.एस.एस. चौगुले तसेच सौ.एस. ए.पाटील यांचा सत्कार केला त्यानंतर सौ. मंजिरी कामत यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून या संपूर्ण कार्यक्रमाची कल्पना ही संस्थेच्या चेअरमन डॉ. सौ मंजिरी मोरे देसाई यांची होती हे स्पष्ट केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळ डेळेकर,उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे,पर्यवेक्षिका सौ. आर.आर.पाटील तसेच विद्यालय व महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एस.ए.पाटील यांनी केले.तसेच आभार जी.व्ही मोहिते यांनी मानले.