कोल्हापूर /प्रतिनिधी
केवळ बौद्धिक विकासावर लक्ष केंद्रित न करता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन हेच विद्यार्थी राष्ट्र उभारणीसाठी सक्षम बनविण्याचे महान कार्य शिक्षकांनी करायचे आहे,त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आवश्यक ते सहकार्य शिक्षकांना व शाळांना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडेकर यांनी दिले.
शिक्षण विभाग प्राथमिक,जिल्हा परिषद, कोल्हापूर व माण देशी फौन्डेशन,म्हसवड, ता.माण जि.सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आदर्श शाळेतील शिक्षकाना निवासी क्रीडा प्रशिक्षण दि.25 ते दि.29 नोव्हेबर अखेर सिवार्चल,कणेरी मठ ता.करवीर येथे पाच दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर पुढे म्हणाल्या शिक्षकांनी आपल्या कौशल्यांच्या जोरावर राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवणारे आदर्श खेळाडू तयार करावेत,त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायीत्व जपणारा आदर्श माणूस घडवावा असे आवाहन केले.
सदर प्रशिक्षणा अंतर्गत सलग पाच दिवस निवासी प्रशिक्षणाअंतर्गत शिक्षकांना कबड्डी,खोखो ,
पोषणमूल्य युक्त आहार,ऍथलेटिक्स ट्रॅक आणि फील्ड,पोक्सो कायदा, सामाजिक जाणीव व खेळातून विकास,भारताचा इतिहास व राजकीय,सांस्कृतिक,
व्यापार विकासात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या राजघराण्याचे अमुल्य योगदान, NIS कोच मार्फत विविध खेळांचे नियम,हातखंडे व प्रात्यक्षिक घेण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.व्ही.कांबळे,शिक्षण विस्तार अधिकारी यांनी केले. या प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर कार्तिकेयन एस. यांचे मार्गदर्शन लाभले.मार्ग यावेळी ३७ प्रशिक्षणार्थीनी रक्तदान करून माणुसकी धर्म जपला.समारोप कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख उपशिक्षणाधिकारी एस. के. यादव,आर.व्ही. कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी, प्रकाश आंग्रे,शिक्षण विस्तार अधिकारी,शशिकांत कदम,रावसाहेब पाटील, भारती सुतार यांचा प्रशिक्षणार्थीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रशिक्षण यशस्वी पूर्ण करण्यासाठी काम करणारे ओंकार गोंजारी संचालक ,सर्व व्यवस्थापक माण देशी फौन्डेशन,व्यवस्थापक चिदंबर चित्रगार,बाजीराव कांबळे,प्रल्हाद जाधव ,प्रमुख विद्या चेतना, कणेरी मठ, राजेंद्र शिंदे व व्यवस्थापक टीम,परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वरस्वामी कणेरी मठ व काडसिद्धेश्वर हायस्कूल क्रीडा शिक्षक व व्यवस्थापक, या सर्व शिक्षकांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी महेश घोटणे यांनी केले तर आभार प्रशिक्षणार्थी प्रीतम गवंडी यांनी मानले.
फोटो
नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आदर्श शाळेतील शिक्षकाना निवासी क्रीडा प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर.