कोल्हापूर / प्रतिनिधी
आपल्या मालमत्तेची काळजी घेणे हे कोणत्याही व्यवस्थापनेचे आद्य कर्तव्य आहे. प्रशासक म्हणून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असले तरी जबाबदारी वाढ़ते हे लक्षात घेता मागील वर्षभरात काम करत असताना शाळांच्या बाबतीत देखभाल दुरुस्ती व नवीन बांधकाम या दोन्ही लेखाशिर्ष अंतर्गत काम करताना शाळांच्या मालकी हक्काचे दस्तऐवजीकरण करण्याची गरज लक्षात आली. यामध्ये खाली बाबी निदर्शनास आलेल्या आहेत.
1) शाळा इमारत दुस-याच्या मालकीची असल्यामुळे दुरुस्तीसाठी निधी देता येत नाही.
2) मुळ वर्गखोली धोकादायक असल्याने निर्लेखन करण्याची परवानगी दिली असता नविन बांधकामाच्यावेळी मुळ मालक बांधकाम सुरु करु देत नाहीत
3) हद्द निश्विती नसलेने, संरक्षक भिंत नसल्यास अतिक्रमण होण्याची शक्यता असते.
4) आवश्यकतेपेक्षा जास्त वर्गखोल्या उपलब्ध असल्यास इतर विभांगाना त्याचा वापर करता येतो.
त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या मालमत्तेचे संरक्षण व संवर्धन होणेसाठी शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा
परिषद कोल्हापूर तर्फे मिशन विद्याभूमी उपक्रम राबवणेत येत आहे.
मिशन विद्याभूमी उपक्रमाची उद्दिष्टे :-
१) शिक्षण विभाग (प्राथमिक) अंतर्गत असलेल्या सर्व शाळांच्या मालमत्तांची माहिती उपलब्ध होणार आहे,
२) किती शाळांची मालकी मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर याची माहिती उपलब्ध होणार आहे.
३) मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे नसलेल्या शाळांच्या मालमत्तेची माहिती उपलब्ध होणार आहे तसेच सदर मालको कोणाची आहे याची माहिती उपलब्ध होणार आहे.
४) शाळांच्या जागेची मोजणी झाली अथवा नाही हे कळेल.
५) शाळांच्या जागेचा मोजणी नकाशा उपलब्ध होईल, नसल्यास जागेची मोजणी करुन घेण्यासाठी कार्यवाही करता येईल.
६) सर्व शाळांची मोजणी झाल्यानंतर अतिक्रमण केले असल्यास त्याची माहिती मिळेल,
७) अतिक्रमण हटवण्यासाठी कार्यवाही करता येईल,
८) सर्व शाळांची जागा मोजणी करुन हद्द निश्चिती झाल्यामुळे त्यानुसार संरक्षक भिंत बांधता येईल,
वरील उद्दिष्टें साध्य करणे अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनी सहभाग घ्यावयाचा आहे. प्रथम टण्यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या जागेसंबंधीची माहिती गुगल लिकव्दारे दिनांक १५/०१/२०२५ पर्यंत जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक यांनी वस्तुनिष्ठ व अचूक भरणेबाबतच्या सूचना देणेत आलेल्या आहेत.अशी माहिती प्रसिद्धीस जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षणाधिकारी प्राथमिक मीना शेंडकर यांनी दिली.