हेरले /प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथील रग्बी खेळातील 14 वर्षाखालील मुले व मुली आणि 17 वर्षाखालील मुले व मुली अशा चारही संघांनी बालेवाडी, पुणे येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय रग्बी क्रिडा स्पर्धेत सुवर्ण पदके प्राप्त केली आहेत. तसेच यातील एकूण 14 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याने रग्बी इंडिया चे अध्यक्ष तथा प्रसिद्ध सिने कलाकार श्री.राहुल बोस यांनी शाळेला भेट दिली .
रग्बी खेळातील शिंगणापूर शाळेच्या बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांनी सर्व खेळाडू व रग्बी प्रशिक्षक श्री दिपक पाटील यांचे विशेष कौतुक केले. तसेच रग्बी खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा शिव छत्रपती पुरस्कार जाहीर झालेले प्रशालेचे माजी विद्यार्थी वैष्णवी पाटील व श्रीधर निगडे या खेळाडूंचेही श्री बोस यांनी अभिनंदन केले. श्री बोस यांनी यानंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना खेळाबाबत प्रोत्साहन दिले. जिल्हा परिषद कोल्हापूरचे चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कार्तिकेयन एस. यांनी रग्बी इंडियाचे अध्यक्ष श्री. बोस यांना प्रशालेचा सर्व परिसर दाखवून प्रशालेमध्ये चालू असलेल्या सर्व क्रीडा प्रकारांची माहिती दिली तसेच भविष्यात येथे नियोजित असलेल्या खेळनिहाय सोयी सुविधा यांचीही माहिती दिली. श्री.बोस यांनी रग्बी खेळातील व इतर खेळातील प्रशिक्षकांचे मूल्यमापन करून त्यांना विशेष प्रशिक्षण, रग्बी खेळाडूंचे मूल्यमापन करून त्यांना प्रशिक्षण तसेच इतर क्रीडा प्रकारांसाठी शक्य ती सर्व मदत पुरविण्याबाबत आश्वासित केले. या भेटी दरम्यान जिल्हा परिषद कोल्हापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .कार्तीकेयन एस, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीम. मीना शेंडकर, प्रशासनाधिकारी श्री. समरजित पाटील, मुख्याध्यापिका श्रीम. आशा शेळके , प्रशालेचे सर्व कर्मचारी,यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक इत्यादी उपस्थित होते.
फोटो
ऑल इंडिया रग्बी अशोसिएशनचे अध्यक्ष तसेच सिनेकलाकार राहुल बोस यांची शिंगणापूर क्रीडा प्रशालेला भेट दिली. शेजारी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर व अन्य मान्यवर