कोल्हापूर / प्रतिनिधी
गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य अंशतः टप्पा अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने नागपूर येथे यशवंत स्टेडियम मध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन यशस्वीरित्या पार पडले यामध्ये आमदार सुधाकर अडबाले,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार अभ्यंकर आमदार दराडे , संगीताताई शिंदे वितेश खांडेकर तसेच अनेक विधिमंडळ सदस्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आमच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक बांधव आंदोलन स्थळी उपस्थित होते.भविष्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनाला आपण बळकटी प्राप्त करून देण्यासाठी असाच उत्स्फूर्त लढा दिला तर यश आपल्याला लवकरात लवकर मिळेल असा विश्वास व्यक्त केला. संघटनेच्या कार्यकारिणीवर विश्वास ठेवून हाकेला प्रतिसाद देऊन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजारोच्या संख्येने पोहोचले होते. आंदोलन खूपच यशस्वी ठरले. आपण यशाच्या एक नाही तर हजार पावले यशस्वीतेच्या दिशेने पुढे गेलो आहोत. आपले निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने नामदार अतुलजी सावे यांनी स्वीकारून सविस्तर चर्चा केली. तसेच नामदार अजितदादा पवार यांच्या स्वीय सहायकांनी एक तासभर चर्चा केली आणि दादांच्या भेटीबद्दल सकारात्मक चर्चा झाली. अशी माहिती प्रा. विजय शिरोळकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य 2005 पूर्वी अंशतः /टप्पा अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर संघटना यांनी प्रसिध्दीस दिली.
फोटो
नामदार अतुलजी सावे यांनी निवेदन स्वीकारून त्यांच्याशी व नामदार अजितदादा पवार यांचे स्वीय सहायक यांच्याशी सकारात्मक चर्चा करतांना प्रा. विजय शिरोळकर व शिष्टमंडळ.