हेरले /प्रतिनिधी
हेरले:-हेरले हायस्कूल केंद्र शाळा नंबर दोन व कन्या शाळा येथे निर्भया पथकाद्वारे विद्यार्थ्यांना पोलिसांच्या निर्भया पथकाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सर्व शाळेच्या मुख्याध्यापक यांनी निर्भया पथक प्रमुख पीयसआय नानासाहेब पवार,पोलिस नाईक शैलेश पाटील, चंदू मोरे,रजनीकांत वाघमोरे त्यांचे स्वागत केले.
यावेळी मार्गदर्शन करताना पीएसआय नानासाहेब पवार म्हणाले की, कुठलाही अन्याय होत असेल, कुणी छेडछाड करत असेल, पाठलाग करत असेल किंवा मोबाइलद्वारे अश्लील बोलत असेल तर अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता घरी आई वडिलांना, शाळेत असाल तर शिक्षकांना किंवा पोलिसांच्या दिलेल्या हेल्पलाइन नंबर किंवा ११२ नंबरवर न घाबरता तक्रार करा. तुम्हाला निश्चितपणे मदत मिळेल. यावेळी कायद्याचे विशिष्ट कलम व त्या अंतर्गत होणारी शिक्षा यांचीही माहिती सांगितली. यावेळी शाळेतील मुलींनीही पथकातल्या सभासदांशी मुक्त संवाद साधला.
यावेळी सरपंच राहुल शेटे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष अमर वड़ड,हेरले हायस्कूल मुख्याध्यापक पी आर शिंदे, केंद्रप्रमुख शहाजी पाटील, केंद्र शाळा मुख्याध्यापक संजय दाभाडे,कन्या शाळा मुख्याध्यापिका भारती कोरे, शाळा नंबर दोन मुख्याध्यापक प्रभाकर चौगुले आणि माजी केंद्रप्रमुख आर.बी. पाटील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
फ़ोटो:- हेरले (ता. हातकणंगले) येथे निर्भया पथक प्रमुख पीएसआय नानासाहेब पवार यांनी हेरले हायस्कूल हेरले येथे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन करत असताना.