रिलायन्स जिओचे कार्ड वापरण्यासाठी तुमच्याकडे 4G मोबाइल नाही म्हणून चिंता करू नका आता जिओ फक्त एक हजार रुपयात 4G स्मार्टफोन उपलब्ध करुन देणार आहे.
हा सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन असणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2017 सालच्या सुरुवातीला हा स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.
या स्मार्टफोनचं नाव “LYF Easy” असू शकते. मात्र, जिओकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या स्मार्टफोनसोबत जिओचा फ्री व्हॉईस कॉलिंग ऑफरही मिळणार आहे.
स्मार्टफोनमध्ये VoLTE सपोर्ट मिळेल.