रक्त आणि पाणी सोबत वाहू शकत नाहीत, असा इशारा देत मोदींनी पाकिस्तानला धडकी भरवली आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते बठिंडामध्ये ‘एम्स’चं भूमीपूजन झालं. त्यानंतर मोदींनी रॅलीला संबोधित केलं.
यावेळी मोदींनी पंजाबच्या शेतकऱ्यांचं कौतुक केलं. “शेतकऱ्यांना पाणी मिळालं तर ते मातीतून सोनं पिकवतील. आमच्या शेतकऱ्यांचं सिंधू नदीच्या पाण्यावर पूर्ण अधिकार आहे. भारताच्या हक्काचं जे पाणी आहे, ते पाणी पाकिस्तानला जाणार नाही”, असं मोदींनी जाहिर केलं.
वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीनंतर साठच्या दशकात हा करार झाला आहे ज्यानुसार सिंधू खोऱ्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले. सतलय, बियास, रावी, या पूर्व खोऱ्यात तर सिंधु, झेलम, चिनाब या पश्चिम खोऱ्यात येतात.
यातल्या पूर्व खोऱ्यातल्या नद्यांचं पाणी हवं तितकं वापरण्याचा अधिकार भारताला आहे.
पश्चिम खो-यातल्या पाण्यावर मात्र काही बंधनं आहेत. पश्चिम खो-यातलं पाणी हे पाकिस्तानला जातं.