इंटरनेटचा अनेकजण मनोरंजनासाठीच वापर करतात , काहीजण माहिती , बातम्या मिळवण्यासाठी करतात पण असेही काही लोक आहेत जे योग्यप्रकारे कल्पकता वापरून चक्क लाखो करोडो रुपयाचा व्यवसाय करत आहेत , याचेच एक उदाहरण म्हणजे बुक माय छोटू हि वेबसाईट आहे . सत्यजित सिंग बेदी हे या वेबसाईटचे संचालक आहेत .त्यांनी लोकांना किरकोळ कामासाठी तात्पुरता कामगार किंवा मदतनीस हवा असतो आणि ऐनवेळी असा मनुष्य मिळणे अवघड होते हे नेमके हेरले .त्यांनी बुक माय छोटूच्या माध्यमातून तात्पुरती सेवा देणाऱ्या मूलांची नोंद केली ,त्यांचे व्हेरिफिकेशन केले ,त्यांना प्रति तास मेहनताना ठरवला आणि आपल्या या कंपनीची सुरुवात केली छोटू या नावातूनच ही हेल्पर सेवा असल्याचं समजतं.सध्या हि कंपनी हरियाणा ,दिल्ली , उत्तर प्रदेश या ३ राज्यात सेवा देत आहे , ग्राहकांनी या वेबसाईटवर जाऊन छोटूची मागणी नोंदवल्यास त्यांना त्वरित सेवा दिली जाते
हि सर्व माहिती आता देण्याचे कारण असे कि ८ नोव्हेंबरनंतर या कंपनीचा व्यवसाय कमालीचा वाढला , लोक पैसे बदलाच्या बँकाच्या रांगेत उभारण्यासाठी या छोटूची फार मोठ्या प्रमाणात मदत घेत आहेत ,
हे छोटू फक्त रांगेत उभं राहण्याचं काम करतात, अर्थात तुमचा नंबर लावून ठेवतात. एटीएम किंवा बँकेच्या रांगेत तुमचा नंबर जवळ आला की तुम्हाला फोन केला जातो. मग तुम्ही छोटूच्या जागी प्रत्यक्ष उभं राहायचं असतं. थोडक्यात बँक किंवा एटीएमचे प्रत्यक्ष व्यवहार तुम्हालाच करायचे असतात.