कोल्हापुर mh9Live Reporter
लग्न म्हणजे पारंपारिक विधी , भटजी शिवाय पुर्णच होऊ शकत नाही पण या पारंपारिक पद्धतीला पुर्णपणे फाटा देऊन सकल मराठा समाज आता सुधारक होत आहे याचे प्रत्यंतर काल मिरज येथील शिव विवाह सोहळ्यात आले ,
अक्षतांची उधळण , मंगलाष्टका , होमहवन या पारंपारिक पद्धतीला फाटा देउन केवळ महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन करुन , शिवशपथ घेउन हा पुराेगामी विवाह पार पडला
आरग येथील वर रोहित इनामदार व रूकडी येथील वधु सोनल अपराध यांचा विवाह पार पडला , त्यावेळी पारंपरिक विधी ऐवजी सर्वप्रथम शिवराय , फुले , आंबेडकर , जिजाऊ , बळीराजा यांच्या प्रतिमांना दांपत्याने पुष्पहार घालुन वंदन केले ,
तुकाराम गाथा , सामुहीक जिजाऊ वंदना , ९ वेळा शिवाष्टका म्हणुन अक्षतांऐवजी फुलांची उधळण करीत शिव विवाह सोहळा संपन्न झाला , यानंतर नवदांपत्याने शिवशपथ घेउन आदर्श वैवाहीक वाटचाल करण्याची शपथ घेतली
आगळ्या वेगळ्या विवाहाची वैशिष्ट्ये
- अक्षता म्हणुन फुलांचा वापर , तांदळाची नासाडी नाही
- लाउडस्पीकर , डॉल्बी नाही
- भटजी नाही
- आहेर नाही
- होमहवन , सप्तपदी नाही
सकल मराठा इतर सर्व बहुजनांना अशा पुरोगामी विवाह सोहळ्याचे अनुकरण करण्याची गरज आहे