ज्या दुकानांमध्ये स्वाईप मशिन्स उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला दोन हजार रुपये काढता येणार आहेत.
आरबीआयतर्फे जाहीर करण्यात आलेल्या निर्णयांपैकी नागरिकांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळे आजपासून कपड्यांची दुकानं, शॉपिंग मॉल्स यासारख्या मोठ्या दुकानांमध्ये तुम्हाला रोख दोन हजार रुपये हाती पडणार आहेत. 30 डिसेंबरपर्यंत कोणतेही ट्रान्जॅक्शन चार्जेस पडणार नाहीत.