" वर्दीमध्ये राहून सीमेचे रक्षण करणारे सैनिकच देशाचे खरे हिरो आहेत. आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी ते प्रत्येक क्षण लढताहेत," असे नाना पाटेकर यांनी म्हटले आहे ,
ते बीएसएफ जवानांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांसह थेट फॉर्वर्ड पोस्टवर गेले होते , तिथे त्यांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या भारतीय चौकीला भेट दिली. यावेळी जवानांच्या हाती असलेल्या आधुनिक शस्त्रसामुग्रीचीही माहिती त्यांनी घेतली.
नाना पाटेकर यांनी जवानांची विचारपूस करून देश त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.