काही व्हॉट्सऍप वापरकरत्यांना ग्रुप व्हिडिओ कॉलिंगसाठी लिंक्स पाठवल्या जात असून , त्यावर क्लिक केल्यानंतर युजर्सची माहिती हॅक करण्याचा प्रयत्न होत आहे .
असाच प्रकार डाटा फ्री , रिचार्ज फ्री , मोबाईल , led tv फ्री , रिबॉक , नाईके शुज या प्रसिद्ध कंपन्यांची नावे वापरुन बोगस लिंक पाठवुन केला जात आहे
एकाने असा मेसेज मिळाला की कोणतीही खातरजमा न करता दुसर्याला पाठवला जात आहे त्यामुळे असे बोगस मेसेज फोफावत असुन सोशल मिडीयावरील तथाकथीत सुशिक्षित मंडळी त्याला खतपाणी घालत आहेत , हा एक सायबर क्राईम आहे
समाजविघातक शक्तींकडून यासाठीच्या लिंक्स युजर्सना पाठविल्या जात असून , या लिंकवर क्लिक केल्यानंतर युजर्सना त्यांच्या कॉन्टॅक्टमधील युजर्सनाही यासाठी आमंत्रित करण्यास सांगितले जात आहे ; तसेच या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपली सर्व वैयक्तिक माहिती आणि अन्य तपशील गोळा केला जात आहे . यामध्ये कॉन्टॅक्टसोबत ई - मेल्स आणि पासवर्ड , नेट बेंकींग , फोटो अन्य गोष्टीही हॅक केल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
लोकांनी अशा लिंक्सच्या बनावाला बळी पडू नये हा सावधानतेचा इशारा