रिलायंस जीओ मोफत डाटा व कॉल देण्यामागे काहीतरी छुपे कारण असणार , नंतर सीम स्लॉट लॉक करणार असे अनेक तर्क काढले जात होते पण यामागचे खरे कारण वेगळेच आहे ते म्हणजे कॉल ड्रॉपचे
ट्रायच्या नविन नियमानुसार जर ग्राहकाचा कॉल बोलताना मध्येच कट झाला तर त्याला भरपाई द्यावी लागते , जीओबरोबर अनेक मोबाइल ऑपरेटर टाय अप न झाल्याने व त्यानी कनेक्टीव्हीटी न दिल्याने कॉल न लागणे , कॉल ड्रॉपचे प्रमाण फार आहे , ट्रायचा दंड बसु नये म्हणून पदरमोड करुन जीओ सध्या मोफत कॉल व डाटा देत आहे , भविष्यात ४५००० नविन टॉवर बसवण्याचे जीओचा मानस आहे , त्यानंतर मात्र हे कॉल ड्रॉपचे प्रमाण नगण्य होईल , साधारपणे मार्च २०१७ पासुन जीओ मुल्य आकारणी सुरु करू शकते , त्यामुळे जीओची फ्री कॉल व डाटा ऑफर मार्चपर्यंत वाढणार ही जीओधारकांसाठी आनंदाची बातमी आहे