हेरले / प्रतिनिधी
दि.9/6/21
हेरले ( ता. हातकणंगले ) येथील नितीन परमाज यांनी पुत्ररत्न झालेबद्दल व सहर्ष विजय शेटे याच्या वाढदिवसानिमित्त तिर्थक्षेत्र श्री कुंथुगिरी आळते येथे एकशे आठ रोपांचे वृक्षारोपण करून आनंदोत्सव साजरा केला.
या वृक्षरोपण कार्यक्रमात नितीन परमाज, विजय शेटे ,रोहन परमाज, अक्षय परमाज ,अरूण लाटवडे, यश परमाज आदींनी सहभाग घेतला.
फोटो
तिर्थक्षेत्र श्री कुंथुगिरी आळते येथे वृक्षारोपण करतांना हेरले गावामधील युवा वर्ग.