हेरले / प्रतिनिधी
दि.18/6/21
मुख्याध्यापक महामंडळावर उपाध्यक्षपदी व्ही.जी.पोवार यांच्या निवडीने कोल्हापूर जिल्ह्याला सन्मान दिला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील वाढत्या समस्या सोडविण्यासाठी यामुळे मदत होईल असे प्रतिपादन शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस.डी लाड यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या
उपाध्यक्षपदी व्ही.जी.पोवार, विभागीय अध्यक्ष एन.आर.भोसले, सदस्य शिवाजीराव कोरवी, चेअरमन सुरेश संकपाळ यांच्या निवडीबद्दल करण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
एस.डी लाड यांनी संघटनांच्या अंतर्गत वादात नुकसान होत आहे त्यामुळे भविष्यात जुटीने काम करावे असे आवाहन केले.यावेळी संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ,उपाध्यक्ष मिलिंद पांगीरेकर,बाबासो बुगडे,सचिव दत्ता पाटील,जॉईंट सेक्रेटरी अजित रणदिवे,बाबासाहेब पाटील,जीवनराव साळोखे यांची भाषणे झाली.
व्ही.जी.पोवार यांनी निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी.पाटील यांचे स्मरण केले.
यावेळी कागल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.टी.चौगुले संचालक श्रीकांत पाटील,सुरेश उगारे,उपस्थित होते.या समारंभाचे स्वागत मिलिंद पांगीरेकर यांनी केले तर आभार शिवाजीराव कोरवी यांनी मानले.
फोटो
व्ही.जी.पोवार यांचा सत्कार करताना जीवनराव साळोखे व मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी