हातकणंगले / प्रतिनिधी
दि.23/6/21
हेरले ( ता. हातकणंगले ) येथील लिम्रास शैक्षणिक, सामाजिक, मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट, हेरले ग्रामपंचायत, मेडिकल असोसिएशन, एमआर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, सेवाभावी संस्था, सर्वपक्षीय ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शनिवारी २६ जून रोजी संपन्न होणाऱ्या जयंती निमित्त औचित्य साधून रक्तदान शिबीराचे अनु शाम मंगल कार्यालयात सकाळी ९ ते ४ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबीरा प्रसंगी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राजूबाबा आवळे, जिल्हा अधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अधिष्ठता एस. एस. मोरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस अधीक्षक (सीआयडी) डॉ. दिनेश बारी, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजाणे, माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ.पद्माराणी पाटील, सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीचे चेअरमन नविद मुश्रीफ,उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात,तहसीलदार प्रदीप उबाळे, पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार,पोलीस पाटील नयन पाटील,कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीचे प्रमुख जाफर सय्यद, लसीकरण अधिकारी डॉ.फारुख देसाई, वैद्यकिय अधिकारी डॉ.राहुल देशमुख, हेरले ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच, मेडिकल असोसिएशन आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे. अशी माहिती प्रसिध्दीस हाजी इकबाल देसाई यांनी दिली.