हेरले /प्रतिनिधी
दि.30/6/21
कोल्हापूर येथील रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज् यांच्या वतीने प्रतिवर्षी देणेत येणारा नेशन बिल्डर अवार्ड बालावधुत हायस्कूल मौजे वडगाव चे अध्यापक राजगोंडा बाळगोंडा पाटील यांना देण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या शिक्षकांसाठी सदरचा पुरस्कार दिला जातो. सन -२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात बालावधुत हायस्कूल मधील अध्यापक राजगोंडा पाटील यांनी गणित विषयाच्या अध्यापना बाबत व त्यांनी केलेल्या भरीव शैक्षणिक कार्याबद्दल पुरस्कार दैनिक सकाळ समूहाचे प्रमुख श्रीराम पवार यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. यावेळी दैनिक सकाळ समूहाचे प्रमुख श्रीराम पवार, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज चेअरमन श्रीकांत झेंडे, आदी मान्यवरां- सह रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
दैनिक सकाळ समूहाचे प्रमुख श्रीराम पवार यांच्या हस्ते रोटरी क्लब चा पुरस्कार स्वीकारताना राजगोंडा पाटील , लिपिक जाधव , व इतर मान्यवर.