हेरले / प्रतिनिधी
दि.27/6/21
जि .प .सदस्या तथा गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या फंडातून व सामाजिक कार्यकर्ते सुनील खारेपाटणे यांच्या विशेष प्रयत्नातून शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी साहित्याचे वाटप सामाजिक कार्यकर्ते सुनील खारेपाटणे यांचे हस्ते करण्यात आले.
मौजे वडगाव ( ता. हातकणंगले )येथे जि. प. सदस्या व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या फंडातून शेतकऱ्यांसाठी लागणारे एकोणीस हजार रुपये किमतीचे कडबा कुट्टी मशीन सात नग, अडीच हजार रुपये किमतीचे औषध फवारणी स्प्रे पंप तीन नग, ताडपत्री , अशा विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. कोरोणा महामारी च्या
काळात शेतकरी वर्ग अडचणीत असताना अशा शेती उपयोगी दिलेल्या साहित्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे .
यावेळी सुनील खारेपाटणे, स्वप्नील चौगुले ,अमोल झांबरे, सतीश वाकरेकर, शितल परमाज, अजमुउद्दीन हजारी, भुपाल चौगुले ,विलास सावंत, विलास येलाज ,शिवाजी यादव, यांच्यासह शेतकरी वर्ग उपस्थित होते .
फोटो
मौजे वडगाव येथे शेती उपयोगी साहित्याचे वाटप करताना सुनील खारेपाटणे, सतीश वाकरेकर,स्वप्नील चौगुले, व इतर मान्यवर.