कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.1/7/21
महाराष्ट राज्य शिक्षण संस्था महामंडळ अंतर्गत कोल्हापूर विभागीय शिक्षण संस्था मंडळाची सभा कोल्हापूर येथील मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात शिक्षक आमदार जयंतराव आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोल्हापूर जिल्हा संस्था संघ अध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
शिक्षक आमदार प्रा. जयंतराव आसगावकर यांनी सर्व प्रश्नावर सविस्तर चर्चा केली योग्य मार्गदर्शन करीत शासनाची भूमिका मांडली. शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड या अत्यंत सकारात्मक असून त्यांच्या
माध्यमातून शिक्षण संस्थाचालकांचे सर्व प्रश्न समाधानकारक पणे सोडवणार असलेचे मत व्यक्त केले .
सर्व प्रथम कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव माळकर यानी उपस्थितांचे
स्वागत व सभेचे प्रस्ताविक केले. शिक्षण क्षेतातील निधन पावलेल्या मान्यवरांना श्रध्दांजली अर्पण करणेत आली . त्यानंतर सभेचे कामकाज सुरू झाले . कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली ,सातारा व सिंधुदुर्ग जिल्हयाचे संचालक, संस्थाचालक यावेळी उपस्थित होते. शिक्षण संस्थांच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली. या सभेत थकित वेतनेतर अनुदान, संचमान्यता ,शाळामूल्यांकान, आर.टी.ई. अॅक्ट , फी वाढ, शाळाप्रवेश,
ऑनलाइन शिक्षण, संस्था शाळा यांचे कोरोना काळातील योगदान ,५वी व ८वी वर्ग जोडणे अडचणी इ.विषयावर चर्चा झाली. यावेळी विभागीय अध्यक्ष शिवाजीराव माळकर , सदानंद भागवत (रत्नागिरी ), नेमिनाथ बिरनाळे ( सांगली ), राज्य खजाणिस रावसाहेब पाटील , डॉ. विरेंद्र वडेर , विभागीय उपाध्यक्ष पुंडलिकभाऊ जाधव ,शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड , राज्य विशेष निमंत्रक नंदकुमार इनामदार, शिक्षकेत्तर राज्य अध्यक्ष बाबासाहेब पाटील आदिंनी मार्गदर्शन केले .
या वेळी नंदकुमार इनामदार यानी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळावर शिक्षक आमदार जयंतराव आसगावकर यांची पदसिद्ध संचालकपदी निवड होणे बाबतचा ठराव मांडला व
तो सर्वानुमते मंजूरही झाला. सभा उत्साहात संपन्न झाली .
फोटो
कोल्हापूर विभागीय संस्था चालक संघटनेच्या बैठकीत पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंतराव आसगावकर यांचा सत्कार वसंतराव देशमुख करताना शेजारी रावसाहेब पाटील , एस.डी.लाड , पुंडलीकभाऊ जाधव