हातकणंगले / प्रतिनिधी
दि.18/6/21
हेरले येथील लिम्रास शैक्षणिक सामाजिक मेडिकल ट्रस्टतर्फे केवळ सामाजिक बांधिलकीतून कोरोना रुग्णांना अडीचशेवर मोफत ऑक्सीजन सिलेंडर चे वाटप करून कोरोना रुग्णांना जीवन दान देण्याचे आदर्शवत कार्य हाजी इकबाल भाई देसाई यांनी केले आहे.
सध्या राज्यात सर्वत्र देशात सर्वत्र कोरोनाचे दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे .त्यातून कित्येकांचे बळी जाऊन संसार उघड्यावर पडण्याची वेळ आलेली आहे.विशेषता या काळात केवळ ऑक्सिजन , व्हेंटिलेटर मुळे कित्येकांना आपले जीव गमावण्याची वेळ आल्याने शासन पातळीवरून कित्येक संस्थांच्या माध्यमातून ऑक्सीजन प्लांट उभारून ऑक्सिजनचे पुरवठा करण्याचे प्रयत्न झाले .परंतु अशा या महामारीच्या काळात हेरले येथील लिम्रस शैक्षणिक सामाजिक मेडिकल संस्थेतर्फे जनतेची अडचण लक्षात घेऊन हेरले,शिरोली हातकणंगले, शिरोळ,इचलकरंजी जयसिंगपूर रूकडी या भागात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या संस्थेचे अध्यक्ष हाजी इक्बाल भाई देसाई यांनी मानवता धर्म पालन म्हणून अडीशेवर जम्बो ऑक्सीजन सिलेंडर चे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत भागात एक वेगळा आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.या शिवाय या कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनचे किती महत्त्व आहे याचा विचार करून वृक्ष लागवडीचे नियोजन करून वृक्षसंवर्धन सुरू केले आहे.याबाबत बोलताना इक्बाल भाई देसाई म्हणाले या महामारीच्या काळात आपले मानवजातीला मदत करून जास्तीत जास्त रुग्णांना जीवन दान प्राप्त करून देण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे.त्यांच्या माध्यमातून आशीर्वादाची शिदोरी हीच उराशी बांधून आम्ही ऑक्सीजन सिलेंडर वाटप करण्याचा निर्णय घेतला असून कोरोना लाट संपेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार आहे.