हेरले / प्रतिनिधी
दि27/6/21
तुम्ही हात द्या , मी साथ देतो
आरोग्य खाते हेरलेकरांच्यासाठी ठामपणे उभे राहील अशी ग्वाही राज्याचे आरोग्य राज्यमंत्री
डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली . ते हेरले (ता. हातकणंगले) येथे अध्यक्ष हाजी इकबाल देसाई यांच्या लिम्रास शैक्षणिक सामाजिक मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट, हेरले ग्रामपंचायत, मेडिकल असोसिएशन, लोकप्रतिनिधी , सर्व तरूण मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलत होते. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले . सध्या कोरोना महामारीमुळे सगळीकडे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीमध्ये हेरलेकरांची साथ ही लाख मोलाची व अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.दिवसभरात विविध मंडळाच्या १८२ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. याप्रसंगी पती दिग्वीजय आलमान व पत्नी प्रज्ञा आलमान यांनी रक्तदान केले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष हाजी इकबाल देसाई यांनी मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
या प्रसंगी खासदार धैर्यशील माने, आमदार राजूबाबा आवळे, बैतुलमाल कमिटी प्रमुख जाफर सय्यद, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील , पंचायत समिती माजी सभापती राजेश पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, कळंबा कारागृहाचे अधिक्षक चंद्रसेन हेडुळकर,पोलिस उपअधिक्षक रामेश्वर वैजाणे,तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी, पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, बादशहा देसाई, पोलिस पाटील नयन पाटील, प्रा. राजगोंड पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख, मुनिर जमादार,सरपंच प्रतिनिधी संदिप चौगुले, उपसरपंच सतिश काशिद, माजी उपसरपंच राहूल शेटे, माजी सरपंच रियाज जमादार, हिम्मत बारगीर, दादासाहेब कोळेकर, डॉ. महावीर पाटील, डॉ.आर.डी. पाटील, डॉ. अमोल चौगुले,डॉ. इम्रान देसाई आदी मान्यवरासह रक्तदाते उपस्थित होते.
फोटो
हेरले : येथे रक्तदान शिबीराचे उद्घाटन करतांना आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर शेजारी हाजी इकबाल देसाई जि. प. माजी सभापती डॉ.पद्माराणी पाटील माजी सभापती राजेश पाटील पोलिस पाटील नयन पाटील व इतर मान्यवर.