हेरले / प्रतिनिधी
दि.1/6/21
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ मुंबईच्या कोल्हापूर विभागिय अध्यक्षपदी संजीवन शिक्षण समूहाचे सहसचिव एन. आर .भोसले यांची
निवड झाली.
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक मंडळाच्या झालेल्या सभेमध्ये विभागिय अध्यक्षपदाची निवड झाली. सर्वांनी सहसचिव एन आर भोसले यांचे मनोमन अभिनंदन केले. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्याच्या अध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन पी. आर. भोसले, प्रशासन, प्रशासिका , प्राचार्य, उपप्राचार्य ,शिक्षक बंधू-भगिनी सर्वांनीच त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाच्या मंडळावर त्यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातून त्यांचे कौतुक होतच आहे. आजपर्यंत त्यांच्या 30 वर्षांच्या या अनुभवावरून त्यांना हा मिळालेला मान सार्थ आणि अभिमानाचा वाटतो.