हेरले / प्रतिनिधी
विद्यार्थी घडवणे हाच माझा धर्म मानून चाळीस वर्ष ज्ञानाचे शिक्षणाचे काम करणाऱ्या नागाव (ता. हातकणंगले) येथील श्रीमती रजनी मधुकर शेटे
यांचा सुशितो ग्रुप कोल्हापूर व वावा मल्टी हॉल वडणगे यांच्यावतीने महिला दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला .
रजनी शेटे बाई यांना नागाव व परिसरातील एकही व्यक्ती ओळखत नाही असा क्वचितच सापडेल . इंग्रजी गणित व मराठी या विषयावर प्रभुत्वने त्यांनी गावातील घडवलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर इंजिनिअर वकील शिक्षक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत .आज ही बाई भेटल्यानंतर त्यांची विद्यार्थी नतमस्तक झाल्याशिवाय राहात नाहीत. हीच त्याच्या शिक्षणातील योगदानाची पावती म्हणावी लागेल.
त्यांचा शिक्षण क्षेत्रातील वारसा डॉ. दीपक , डॉ.विवेक ,मुलगी गीतांजली व सून सुजाता शेटे पुढे चालवत आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी इत्यादी पदे त्याकाळी नाकारले आहेत .
"माझ्या विद्यार्थ्यांनी दिलेलं प्रेम व माझ्या कुटुंबाचे शिक्षण क्षेत्रातील योगदान पाहून मन समाधानी होतं .वयाच्या ७४ व्या वर्षी मिळालेला हा पुरस्कार मनाला सुखद आनंद देणारा आहे . सुशितो ग्रुप वर तोडकर परिवाराचे मनापासून आभार" अशी प्रतिक्रिया शेटे बाई यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
फोटो
नागाव येथील श्रीमती रजनी मधुकर शेटे
यांचा सुशितो ग्रुप कोल्हापूर व वावा मल्टी हॉल वडणगे यांच्यावतीने महिला दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देऊन सन्मान करतांना पदाधिकारी.