कोल्हापूर / प्रतिनिधी
इलेक्ट्रिकल सेल्स एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूर (ई-सेवा) आयोजित आणि संजीवन ब्लड सेंटर यांच्या सौजन्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरामध्ये ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबीरासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संजय शेटे , सचिव धनंजय दुगे , इलेक्ट्रिकल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजित कोठारी साहेब, उपाध्यक्ष महेंद्रभाई पोरवाल, महालक्ष्मी फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष अविनाश उरसाल यांनी उपस्थिती लावली होती.
शिबीरामध्ये ई-सेवा सभासद, संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी आणि मित्र मंडळींनी रक्तदान केले. तसेच महीला रक्तदात्या ही उत्स्फूर्तपणे शिबीरामध्ये सहभागी झाल्या होत्या.
इलेक्ट्रिकल सेल्स एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशन, (ई-सेवा) कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. यापूर्वी कोल्हापूर महापालिकेच्या आवाहनाला साद देत शेणी-दान हा सामाजिक उपक्रम राबविला होता.
रक्तदान शिबीरासाठी ई-सेवा अध्यक्ष किरण दीक्षित, उपाध्यक्ष निखिल पोवार, सचिव किशोर गुरव, खजिनदार संदीप बनसोडे, संचालक संदीप पोवार, युवराज बोडके, विवेक चौगुले, विवेक जाधव, महादेव चौगुले, स्वप्निल चौगुले, अनिकेत भोसले, नामदेव कोळेकर, गुरुप्रसाद माळकर, अनिरुद्ध सोळांकुरकर, माजी संचालक सतीश चौगुले, राजाराम कांबळे, विजय भोपळे आणि सभासदांचे योगदान लाभले.